PSL 2022: अरे, हे काय! झेल सोडला म्हणून हरिस रौफने आपल्या सहकाऱ्याला चक्क कानशिलात लगावली, पाकिस्तान क्रिकेटमधील ‘स्लॅप-गेट’ Video व्हायरल

PSL 2022: पाकिस्तान सुपर लीग (PSL) 2022 च्या पेशावर झलमी विरुद्ध सामन्यादरम्यान लाहोर कलंदरचा वेगवान गोलंदाज हारीस रौफ याने त्याचा सहकारी कामरान गुलामला चक्क कानशिलात लगावली. डावाच्या दुसऱ्याच षटकात लाहोरच्या रौफ याने पेशावर झल्मीच्या मोहम्मद हरीसला बाद केले आणि पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज विकेटचा आनंद साजरा करताना ही घटना घडली.

PSL 2022: अरे, हे काय! झेल सोडला म्हणून हरिस रौफने आपल्या सहकाऱ्याला चक्क कानशिलात लगावली, पाकिस्तान क्रिकेटमधील ‘स्लॅप-गेट’ Video व्हायरल
हारिस रौफने कामरान गुलामला चपराक मारली (Photo Credit: Twitter)

PSL 2022: पाकिस्तान सुपर लीग (Pakistan Super League) 2022 ला सोमवारी ‘स्लॅप गेट’ पाहायला मिळाले जेव्हा लाहोर कलंदरचा (Lahore Qalandars) वेगवान गोलंदाज हारिस रौफने (Haris Rauf) पेशावर झल्मी विरुद्ध महत्त्वाच्या सामन्यात झेल सोडल्याबद्दल त्याचा सहकारी कामरान गुलामला (Kamran Ghulam) चपराक मारली. डावाच्या दुसऱ्याच षटकात लाहोरच्या रौफ याने पेशावर झल्मीच्या  (Peshawar Zalmi) मोहम्मद हारिसला बाद केले आणि पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज विकेटचा आनंद साजरा करताना ही घटना घडली. तत्पूर्वी, त्याच षटकात गुलामने हजरतुल्लाह झझईचा झेल सोडला होता.

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Feb 22, 2022 12:16 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).