Prithvi Shaw Double Century: इंग्लंडच्या धरतीवर पृथ्वी शॉची धडाकेबाज फलंदाजी, ठोकले द्विशतक; केल्या इतक्या धावा (Watch Video)
ओपनिंग करताना त्याने अवघ्या 129 चेंडूत द्विशतक झळकावले. सुरूवातीच्या 81 चेंडूत शतक अन् पुढच्या 50 चेंडूत द्विशतकाला गवसणी घालून पृथ्वीने ऐतिहासिक खेळी केली.
गेल्या काही काळापासून खराब फॉर्मशी झगडत असलेल्या पृथ्वी शॉने (Prithvi Shaw) आपल्या स्फोटक फलंदाजीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. इंग्लंडमध्ये खेळल्या जात असलेल्या वन डे चषकात नॉर्थम्प्टनशायरकडून खेळताना पृथ्वी शॉने सॉमरसेटविरुद्ध शानदार फलंदाजी केली. ओपनिंग करताना त्याने अवघ्या 129 चेंडूत द्विशतक झळकावले. सुरूवातीच्या 81 चेंडूत शतक अन् पुढच्या 50 चेंडूत द्विशतकाला गवसणी घालून पृथ्वीने ऐतिहासिक खेळी केली. पृथ्वीने शेवटच्या षटकापर्यंत 150 च्या स्ट्राईक रेटने फलंदाजी केली. त्याने 153 चेंडूत 28 चौकार आणि 11 षटकारांसह एकूण 244 धावा केल्या. जरी त्याने आणखी तीन चेंडू खेळले असते तर तो नाबाद राहिला असता. 50 व्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर डॅनी लॅम्बने त्याला जॉर्ज थॉमसकरवी झेलबाद केले आणि पॅव्हेलियनमध्ये पाठवले. या शानदार खेळीत पृथ्वी 219 मिनिटे मैदानातच राहिला. हा त्याच्या लिस्ट ए कारकिर्दीतील सर्वात मोठा स्कोअर होता.
पहा व्हिडिओ
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)