IND vs AUS, World Cup Final: पंतप्रधान मोदी आणि ऑस्ट्रेलियाच्या उपपंतप्रधानांनी पॅट कमिन्सला दिली वर्ल्ड कप ट्रॉफी, कांगारू सहाव्यांदा बनला विश्वविजेता

भारताने दिलेले 241 धावांचे लक्ष्य ऑस्ट्रेलियाने 4 गडी गमावून पूर्ण केले. ट्रॅव्हिस हेडने या सामन्यात ऑस्ट्रेलियाकडून सर्वाधिक 137 धावांची खेळी खेळली. आपल्या खेळीदरम्यान हेडने 15 चौकार आणि 4 षटकार मारले. याशिवाय मार्नस लाबुसेनने 58 धावांची नाबाद खेळी खेळली.

वर्ल्ड कप 2023 चा अंतिम सामना भारत आणि ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) यांच्यात खेळला गेला. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताचा पराभव करत सहाव्यांदा एकदिवसीय विश्वचषक जिंकला. भारताने दिलेले 241 धावांचे लक्ष्य ऑस्ट्रेलियाने 4 गडी गमावून पूर्ण केले. ट्रॅव्हिस हेडने या सामन्यात ऑस्ट्रेलियाकडून सर्वाधिक 137 धावांची खेळी खेळली. आपल्या खेळीदरम्यान हेडने 15 चौकार आणि 4 षटकार मारले. याशिवाय मार्नस लाबुसेनने 58 धावांची नाबाद खेळी खेळली. सुरुवातीचे 3 विकेट झटपट पडल्यानंतर ट्रॅव्हिस हेडने केवळ डाव सांभाळला नाही तर संघाला विजय मिळवून देण्यातही महत्त्वाची भूमिका बजावली. भारताकडून गोलंदाजी करताना जसप्रीत बुमराहने सर्वाधिक 2 बळी घेतले. याशिवाय मोहम्मद शमीने एक विकेट आपल्या नावावर केली.

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement