PBKS vs SRH IPL 2021: सनरायझर्स गोलंदाज चमकले, पंजाब किंग्सचा निर्णय फसला; हैदराबादला विजयासाठी 121 धावांचे माफक आव्हान
आयपीएलच्या 14व्या सामन्यात पंजाब किंग्सचा टॉस जिंकून फलंदाज करण्याचा निर्णय फसला आणि निर्धारित 19.4 ओव्हरमध्ये 120 धावाच करू शकले. अशाप्रकारे सनरायझर्स हैदराबादला आता विजयासाठी 121 धावांचं माफक लक्ष्य मिळालं आहे.
PBKS vs SRH IPL 2021: आयपीएलच्या (IPL) 14व्या सामन्यात पंजाब किंग्सचा (Punjab Kings) टॉस जिंकून फलंदाज करण्याचा निर्णय फसला आणि निर्धारित 19.4 ओव्हरमध्ये 120 धावाच करू शकले. अशाप्रकारे सनरायझर्स हैदराबादला (Sunrisers Hyderabad) आता विजयासाठी 121 धावांचं माफक लक्ष्य मिळालं आहे. पंजाबकडून एकही फलंदाज 25 धावसंख्या पार करू शकला नाही. शाहरुख खान (Shahrukh Khan) आणि मयंक अग्रवाल (Mayank Agarwal) प्रत्येकी 22 धावा करून बाद झाले. दुसरीकडे, हैदराबाद संघासाठी खालील अहमदने (Khaleel Ahmad) 3 गडी बाद केले. अभिषेक शर्माला 2 तर भुवनेश्वर कुमार, सिद्धार्थ कौल आणि राशिद खान यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)