PBKS vs MI IPL 2021 Match 17: रोहित शर्माचे झुंजार अर्धशतक, हार्दिक पांड्याचा ‘फ्लॉप शो’; पंजाबला विजयासाठी 132 धावांचं लक्ष्य
पंजाब किंग्स विरोधात चेन्नईच्या एम.ए. चिदंबरम स्टेडियमवर सुरु असलेल्या आयपीएल सामन्यात मुंबई इंडियन्सने पहिले फलंदाजी करत 20 ओव्हरमध्ये 6 विकेट गमावून 131 धावा केल्या आणि पंजाबला विजयासाठी 132 धावांचं लक्ष्य दिलं आहे. मुंबईसाठी कर्णधार रोहित शर्माने 52 चेंडूत 63 धावांची झुंजार अर्धशतकी खेळी केली.
PBKS vs MI IPL 2021 Match 17: पंजाब किंग्स (Punjab Kings) विरोधात चेन्नईच्या (Chennai) एम.ए. चिदंबरम स्टेडियमवर सुरु असलेल्या आयपीएल सामन्यात मुंबई इंडियन्सने (Mumbai Indians) पहिले फलंदाजी करत 20 ओव्हरमध्ये 6 विकेट गमावून 131 धावा केल्या आणि पंजाबला विजयासाठी 132 धावांचं लक्ष्य दिलं आहे. मुंबईसाठी कर्णधार रोहित शर्माने (Rohit Sharma) 52 चेंडूत 63 धावांची झुंजार अर्धशतकी खेळी केली. सूर्यकुमार यादवने 33 धावांचे योगदान दिले. किरोन पोलार्ड 16 धावा करून नाबाद परतला. आजच्या सामन्यात मुंबईसाठी हार्दिक पांड्याचा फ्लॉप शो सुरूच राहिला. हार्दिक आज 1 धाव करून तंबुत परतला. दुसरीकडे, पंजाबसाठी रवि बिश्नोई (Ravi Bishnoi) आणि मोहम्मद शमीने सर्वाधिक 2 तर दीपक हुड्डा आणि अर्शदीप सिंह यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली.
Innings Break: @mipaltan post 131-6 from their 20 overs after being asked to bat first by @PunjabKingsIPL. https://t.co/NMS54FiJ5o #VIVOIPL #PBKSvMI pic.twitter.com/MetpFHdkyD
— IndianPremierLeague (@IPL) April 23, 2021
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Apr 23, 2021 09:16 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

