PBKS vs DC IPL 2021 Match 29: कर्णधार मयंक अग्रवालचे झुंजार अर्धशतक, पंजाबचे दिल्लीला विजयासाठी 167 धावांचे दमदार आव्हान

दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध आयपीएल सामन्यात पंजाब किंग्सने संघाचा प्रभारी कर्णधार मयंक अग्रवालच्या झुंजार अर्धशतकी खेळीच्या जोरावर 6 विकेट गमावून 166 धावा केल्या आहेत. दिल्ली नियमित कर्णधार केएल राहुलच्या अनुपस्थितीत नेतृत्वाची कमान सांभाळणाऱ्या मयंकने 58 चेंडूत 99 धावांची नाबाद खेळी केली. यामध्ये त्याने 8 चौकार व 4 षटकार ठोकले.

मयंक अग्रवाल, दिल्ली विरुद्ध पंजाब आयपीएल (Photo Credit: PTI)

PBKS vs DC IPL 2021 Match 29: दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध (Delhi Capitals) आयपीएल  (IPL) सामन्यात पंजाब किंग्सने (Punjab Kings) संघाचा प्रभारी कर्णधार मयंक अग्रवालच्या (Mayank Agarwal) झुंजार अर्धशतकी खेळीच्या जोरावर 6 विकेट गमावून 166 धावा केल्या आहेत. दिल्ली नियमित कर्णधार केएल राहुलच्या अनुपस्थितीत नेतृत्वाची कमान सांभाळणाऱ्या मयंकने 58 चेंडूत 99 धावांची नाबाद खेळी केली. यामध्ये त्याने 8 चौकार व 4 षटकार ठोकले. मयंक वगळता अन्य फलंदाज प्रभावी खेळी करू शकले नाही. डेविड मलानने (Dawid Malan) 26 धावांची खेळी केली. दुसरीकडे, दिल्लीच्या गोलंदाजांनी शानदार कामगिरी करत पंजाबला मोठ्या धावसंख्येपर्यंत पोहचू दिले नाही. कगिसो रबाडाने (Kagiso Rabada) सर्वाधिक 3 विकेट्स काढल्या तर आवेश खान व अक्षर पटेलला प्रत्येकी 1 विकेट मिळाली.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now