Pakistan vs England 3rd Test 2024 Toss Update: अंतिम कसोटी सामन्यात इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा घेतला निर्णय, पाहा दोन्ही संघांची प्लेइंग 11

इंग्लंडने पहिली कसोटी सामना एक डाव आणि 47 धावांनी जिंकला होता. मात्र, दुसऱ्या कसोटीत पाकिस्तानने दमदार पुनरागमन करत इंग्लंडचा 152 धावांनी पराभव केला. अशा स्थितीत दोन्ही संघाना मालिका जिंकण्याची संधी आहे.

ENG vs PAK (Photo Credit - X)

Pakistan National Cricket Team vs England National Cricket Team 3rd Test 2024: पाकिस्तान राष्ट्रीय क्रिकेट संघ विरुद्ध इंग्लंड राष्ट्रीय क्रिकेट संघ यांच्यातील तिसऱ्या कसोटी सामन्याला आजपासून सुरुवात होत आहे. रावळपिंडी येथील रावळपिंडी क्रिकेट स्टेडियमवर दोन्ही संघांमध्ये हा सामना भारतीय वेळेनुसार 10.30 वाजता खेळवला जाणार आहे. तीन सामन्यांची कसोटी मालिका सध्या 1-1 अशी बरोबरीत आहे. इंग्लंडने पहिली कसोटी सामना एक डाव आणि 47 धावांनी जिंकला होता. मात्र, दुसऱ्या कसोटीत पाकिस्तानने दमदार पुनरागमन करत इंग्लंडचा 152 धावांनी पराभव केला. अशा स्थितीत दोन्ही संघाना मालिका जिंकण्याची संधी आहे. त्यामुळे तिसरा कसोटी सामना रोमांचक होण्याची अपेक्षा आहे. दरम्यान, इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

दोन्ही संघाची प्लेइंग 11

पाकिस्तान (प्लेइंग इलेव्हन): सैम अयुब, अब्दुल्ला शफीक, शान मसूद (कर्णधार), कामरान गुलाम, सौद शकील, मोहम्मद रिझवान (विकेटकीपर), आगा सलमान, आमेर जमाल, नोमान अली, साजिद खान, जाहिद महमूद

इंग्लंड (प्लेइंग इलेव्हन): झॅक क्रॉली, बेन डकेट, ऑली पोप, जो रूट, हॅरी ब्रूक, बेन स्टोक्स (कर्णधार), जेमी स्मिथ (विकेटकीपर), गस ऍटकिन्सन, रेहान अहमद, जॅक लीच, शोएब बशीर

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement