PAK vs BAN 1st Test: बांगलादेशविरुद्धच्या पहिल्या कसोटीसाठी पाकिस्तानने वेगवान गोलंदाजांची उतरवली फौज, 'या' खेळाडूंना प्लेइंग 11 मध्ये मिळाले स्थान
पाकिस्तानने पहिल्या कसोटी सामन्यासाठी आपली प्लेइंग इलेव्हन जाहीर केली आहे. पाकिस्तानच्या या प्लेइंग इलेव्हनमध्ये स्पेशालिस्ट स्पिनर नाही.
Pakistan's playing XI for the first Test: पाकिस्तानला बांगलादेशविरुद्धच्या 2 सामन्यांच्या कसोटी मालिकेत सहभागी व्हायचे आहे आणि पहिला सामना 21 ऑगस्टपासून रावळपिंडी येथे खेळवला जाईल. पाकिस्तानने पहिल्या कसोटी सामन्यासाठी आपली प्लेइंग इलेव्हन जाहीर केली आहे. पाकिस्तानच्या या प्लेइंग इलेव्हनमध्ये स्पेशालिस्ट स्पिनर नाही. या संघात चार वेगवान गोलंदाजांना संधी देण्यात आली असून गेल्या 28 वर्षात दुसऱ्यांदा पाकिस्तान मायदेशात स्पेशालिस्ट फिरकीपटूशिवाय केवळ वेगवान गोलंदाजीसह खेळणार आहे.
पहिल्या कसोटीसाठी पाकिस्तानची प्लेइंग इलेव्हन
अब्दुल्ला शफीक, सैम अयुब, शान मसूद (कर्णधार), बाबर आझम, सौद शकील (उपकर्णधार), मोहम्मद रिझवान (यष्टीरक्षक), सलमान अली आगा, शाहीन आफ्रिदी, नसीम शाह, खुर्रम शहजाद, मोहम्मद अली.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)