Mohammad Hasnain Suspended: पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज मोहम्मद हसनैन PSL 2022 आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निलंबित, बेकायदेशीर गोलंदाजी कृती समोर आली

ऑस्ट्रेलियात नुकत्याच पार पडलेल्या बिग बॅश लीगमध्ये हसनैनच्या गोलंदाजीची क्रिया पंचांनी नोंदवली होती. हसनैनने 2019 मध्ये पाकिस्तानमध्ये पदार्पण केल्यानंतर आठ एकदिवसीय सामने आणि 18 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत.

मोहम्मद हसनैन (Photo Credit: Getty)

Mohammad Hasnain Suspended: पाकिस्तान (Pakistan) वेगवान गोलंदाज मोहम्मद हसनैनची (Mohammad Hasnain) गोलंदाजी बेकायदेशीर असल्याचे आढळून आल्यानंतर त्याला गोलंदाजीतून निलंबित करण्यात आले आहे. ऑस्ट्रेलियात नुकत्याच पार पडलेल्या बिग बॅश लीगमध्ये  (Big Bash League) हसनैनच्या गोलंदाजीची क्रिया पंचांनी नोंदवली होती. 21 वर्षीय हसनैनची लाहोरमधील ICC-मान्यताप्राप्त बायोमेकॅनिक्स प्रयोगशाळेत गोलंदाजीची चाचणी घेण्यात आली.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)