IPL Auction 2025 Live

PAK vs BAN: पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज हरिस रौफची आशिया चषकात मोठी कामगिरी, वनडेमध्ये 50 विकेट केल्या पुर्ण

एकदिवसीय क्रिकेटमध्ये पाकिस्तानकडून सर्वात जलद 50 बळी घेणारा तो चौथा गोलंदाज ठरला आहे.

Haris Rauf (Photo Credit - Twitter)

आशिया चषकात (Asia Cup 2023) पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज हरिस रौफ (Haris Rauf) हा किलर गोलंदाजी करत आहे. सुपर फोरच्या पहिल्या सामन्यात त्याने बांगलादेशविरुद्ध पहिले दोन विकेट घेतल्या होत्या. मोहम्मद नईम आणि तौहीद हृदयॉय यांना बाद केल्याने रौफने आपल्या नावावर मोठा विक्रम नोंदवला आहे. एकदिवसीय क्रिकेटमध्ये पाकिस्तानकडून सर्वात जलद 50 बळी घेणारा तो चौथा गोलंदाज ठरला आहे. पाकिस्तानकडून सर्वात जलद 50 बळी घेण्याच्या बाबतीत हारिस रौफने अनुभवी गोलंदाज सकलेन मुश्ताकला मागे टाकले आहे. सकलेन मुश्ताकने 28 सामन्यात 50 विकेट घेतल्या, तर रौफने 27 सामन्यात विकेट घेतल्या. वेगवान गोलंदाज हसन अली या यादीत अव्वल स्थानावर आहे, ज्याने एकदिवसीय क्रिकेटमध्ये पाकिस्तानकडून अवघ्या 24 सामन्यांत 50 विकेट घेतल्या आहेत.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)