PAK vs BAN 1st Test Live Score Update: पाकिस्तानने पाहिला डाव 448 धावांवर केला घोषित, कर्णधार शान मसूदचा धक्कादायक निर्णयामुळे रिझवानचे द्विशतक हुकले
त्याने 113 षटकांनंतर पाकिस्तानचा डाव 448 धावांवर घोषित केला. मोहम्मद रिझवान द्विशतकाच्या जवळ असताना मसूदने हा निर्णय घेतला.
Pakistan National Cricket Team vs Bangladesh National Cricket Team: पाकिस्तान राष्ट्रीय क्रिकेट संघ (Pakistan National Cricket Team) विरुद्ध बांगलादेश राष्ट्रीय क्रिकेट संघ (Bangladesh National Cricket Team) यांच्यातील पहिला कसोटी सामना रावळपिंडी येथे खेळवला जात आहे. दरम्यान, गुरुवारी दुसऱ्या दिवशी पाकिस्तानचा कर्णधार शान मसूदने धक्कादायक निर्णय घेतला. त्याने 113 षटकांनंतर पाकिस्तानचा डाव 448 धावांवर घोषित केला. मोहम्मद रिझवान द्विशतकाच्या जवळ असताना मसूदने हा निर्णय घेतला. रिझवानने शानदार फलंदाजी करत 239 चेंडूत 11 चौकार आणि 3 षटकारांसह नाबाद 171 धावा केल्या, मात्र मसूदने त्याला द्विशतक पूर्ण करण्याची संधी दिली नाही. रिझवानने द्विशतक झळकावले असते तर त्याच्या नावावर मोठा विक्रम झाला असता. अशी कामगिरी करणारा तो पाकिस्तानचा केवळ तिसरा यष्टिरक्षक ठरला असता. 233 धावा करून त्याने यष्टिरक्षक म्हणून सर्वाधिक धावा करण्याचा विश्वविक्रम मोडला असता, परंतु मसूदच्या निर्णयामुळे हे होऊ शकले नाही.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)