Pakistan T20 World Cup 2021 Squad: पाकिस्तानच्या 15 सदस्यीय टी-20 वर्ल्ड कप संघात तीन बदल, पहा कोणत्या खेळाडूंचा केला समावेश
राष्ट्रीय निवडकर्त्यांनी खेळाडूंची कामगिरी आणि राष्ट्रीय टी-20 मधील अलीकडील फॉर्म विचारात घेत संघात तीन बदलांची पुष्टी केली. सरफराज आणि हैदर अलीने अनुक्रमे आजम खान आणि मोहम्मद हसनैन यांची जागा घेतली आहे.
पाकिस्तानने (Pakistan) आगामी आयसीसी पुरुष टी-20 वर्ल्ड कप (Men's T20 World Cup) स्पर्धेसाठी हैदर अली (Haider Ali), फखर जमान आणि माजी कर्णधार सरफराज अहमद (Sarfaraz Ahmed) यांना त्यांच्या 15 सदस्यीय संघात समाविष्ट करण्याची घोषणा केली. राष्ट्रीय निवडकर्त्यांनी खेळाडूंची कामगिरी आणि राष्ट्रीय टी-20 (National T20) मधील अलीकडील फॉर्म विचारात घेत संघात तीन बदलांची पुष्टी केली. सरफराज आणि हैदर अलीने अनुक्रमे आजम खान आणि मोहम्मद हसनैन यांची जागा घेतली आहे, तर फखार जमान, ज्याला मूलतः राखीव ठेवण्यात आले होते, त्याने खुशदील शाहची जागा घेतली.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)