PAK vs ENG, Final T20 Live Streaming Online: थोड्याच वेळात पाकिस्तान- इंग्लंड फायनल सामन्याला होणार सुरुवात, जाणून घ्या कधी आणि कुठे पाहणार सामना

नाणेफेक दुपारी 1.00 वाजता होईल. तसेच स्टार स्पोर्ट्स नेटवर्ककडे T20 विश्वचषकाच्या प्रसारणाचे अधिकार आहेत.

PAK vs ENG (Photo Credit - Twitter)

रविवारी मेलबर्नमध्ये (MCG) पाकिस्तान आणि इंग्लंड (PAK vs ENG) यांच्यात टी-20 विश्वचषकाचा अंतिम सामना रंगणार आहे. हा अंतिम सामना भारतीय वेळेनुसार दुपारी 1.30 वाजता आहे. नाणेफेक दुपारी 1.00 वाजता होईल. तसेच स्टार स्पोर्ट्स नेटवर्ककडे T20 विश्वचषकाच्या प्रसारणाचे अधिकार आहेत. हिंदी आणि इंग्रजी व्यतिरिक्त, तुम्ही स्टार स्पोर्ट्सच्या विविध चॅनेलवर देशातील इतर भाषांमध्ये कॉमेंट्रीसह हा सामना पाहू शकता. या सामन्याचे लाईव्ह-स्ट्रीमिंग भारतातील Disney+ Hotstar अॅपवर पाहता येईल.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)