PAK vs BAN T20I Series 2025 Schedule: मे महिन्यात बांगलादेश संघ पाकिस्तान दौऱ्यावर; 5 सामन्यांच्या टी 20 मालिकांचे संपूर्ण वेळापत्रक जाहीर

बांगलादेश संघ मे महिन्यात पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेसाठी पाकिस्तानचा दौरा करणार आहे. ही मालिका 25 मे ते 3 जून दरम्यान फैसलाबाद आणि लाहोरमध्ये खेळवली जाईल.

Photo Credit- X

Pakistan National Cricket Team vs Bangladesh National Cricket Team: पाकिस्तान (Pakistan Cricket Team) आणि बांगलादेशमध्ये (Cricket Team) मे महिन्यात पाच सामन्यांची टी-20 मालिका होणार आहे. त्यासाठी बांगलादेश संघ पाकिस्तानचा दौरा करेल. ही मालिका 25 मे ते 3 जून दरम्यान फैसलाबाद आणि लाहोरमध्ये खेळवली जाईल. सुरुवातीला फ्युचर टूर्स प्रोग्राम (FTP) अंतर्गत या मालिकेत तीन एकदिवसीय आणि तीन टी-२० आंतरराष्ट्रीय सामने खेळवण्यात येणार होते, परंतु आता हा दौरा पाच टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांचा असेल. तब्बल 17 वर्षांनंतर इक्बाल स्टेडियमवर आंतरराष्ट्रीय क्रिकेटची ही मालिका होणार आहे. 1978 ते 2008 दरम्यान येथे 24 कसोटी आणि 16 एकदिवसीय सामने खेळले गेले आहेत. या ऐतिहासिक ठिकाणी शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना एप्रिल 2008 मध्ये बांगलादेश आणि पाकिस्तान यांच्यातील एकदिवसीय सामना होता. मालिकेतील पहिले आणि दुसरे टी-20 सामने येथे 25 मे आणि 27 मे रोजी होतील. उर्वरित तीन टी-20 सामने लाहोरच्या गद्दाफी स्टेडियमवर (Gaddafi Stadium)30 मे, 1 आणि 3 जून रोजी खेळवले जातील.

 बांगलादेश संघाचा पाकिस्तान दौरा

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement