Australia Tour of Pakistan: ऐतिहासिक मालिकेसाठी 24 वर्षांनंतर ऑस्ट्रेलिया खेळाडूंची फौज पाकिस्तानात दाखल, खेळाडूंनी शेअर केले Photos

पाकिस्तानच्या ऐतिहासिक दौऱ्यावर ऑस्ट्रेलियाचा क्रिकेट संघ 24 वर्षांनंतर इस्लामाबादमध्ये पोहोचला आहे. पॅट कमिन्सच्या नेतृत्वातील कसोटी संघाने रविवारी पाकिस्तानच्या भूमीवर पाऊल ठेवले. सर्वांचे लक्ष ऑस्ट्रेलियाच्या पाकिस्तान दौऱ्याकडे लागले आहे कारण संघाने यापूर्वी सुरक्षेच्या कारणास्तव येथे खेळणे टाळले होते.

ऑस्ट्रेलियाचा पाकिस्तान दौरा 2022 (Photo Credit: Twitter)

ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघ (Australia Cricket Team) 24 वर्षांनंतर पाकिस्तानात (Pakistan) पोहोचला आहे. स्टीव्ह स्मिथसह अनेक खेळाडूंनी त्यांच्या आगमनाचे फोटो शेअर केले. या दौऱ्यात उभय संघात 3 कसोटी, 3 वनडे आणि एक टी-20 सामना खेळला जाईल. ऑस्ट्रेलियाने शेवटचा 1998 मध्ये पाकिस्तानचा दौरा केला होता. 2009 मध्ये पाकिस्तानमध्ये श्रीलंका संघाच्या (Sri Lanka Cricket Team) बसवर दहशतवादी हल्ला झाल्यापासून कोणताही संघ तेथे जाण्यास संकोच करत होते. तसेच 5 वर्षांपूर्वी लाहोरमधील चर्चवर झालेल्या आत्मघाती हल्ल्यानंतर ऑस्ट्रेलियन संघानेही पाकिस्तानात जाण्यास नकार दिला होता.

ऑसी खेळाडू इस्लामाबादला आले आहेत

ऑस्ट्रेलियन संघाचे इस्लामाबाद येथे आगमन!

स्टिव्ह स्मिथ

उस्मान ख्वाजा

 

View this post on Instagram

 

A post shared by Usman Khawaja (@usman_khawajy)

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement