PAK vs AUS 3rd Test: लाहोर कसोटीत Steve Smith याचा जलवा, सर्वात जळत 8000 धावांचा टप्पा पूर्ण करून ठरला दिग्गजांच्या वरचढ

स्टीव्ह स्मिथ सर्वात जलद 8,000 कसोटी धावा पूर्ण करणारा फलंदाज ठरला आणि लाहोरमध्ये पाकिस्तानविरुद्ध ऑस्ट्रेलियाच्या तिसऱ्या सामन्यात कुमार संगकाराचा 12 वर्षांचा विक्रम मोडीत काढला. संगकाराने हा टप्पा गाठण्यासाठी 152 डाव खेळले तर स्मिथ 151 डावांत 8 हजार मनसबदार बनला. तसेच या यादीत तिसऱ्या क्रमांकावर सचिन तेंडुलकर आहे, ज्याने भारतासाठी 154 व्या डावात हा आकडा पूर्ण केला.

स्टीव्ह स्मिथ (Photo Credit: Twitter/cricketcomau)

पाकिस्तानविरुद्ध (Pakistan) लाहोर कसोटीच्या चौथ्या दिवशी ऑस्ट्रेलियाचा (Australia) उपकर्णधार स्टीव्ह स्मिथ (Steve Smith) 8,000 कसोटी धावा पूर्ण करणारा सर्वात जलद फलंदाज बनला. त्याने लाहोर कसोटीत (Lahore Test) ऑस्ट्रेलियाच्या तिसऱ्या सामन्यात कुमार संगकाराला (Kumar Sangakkara) मागे टाकत 12 वर्षांचा विक्रम मोडला. 32 वर्षीय फलंदाजाने हसन अलीच्या चेंडूवर चौकार मारून त्याच्या 85 व्या कसोटीच्या 151व्या डावात नवीन वर्ल्ड रेकॉर्ड ची नोंद केली. संगकारा यांनी 91 कसोटी सामन्यांच्या 152 डावांत विक्रमी कामगिरी केली होती.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now