PAK vs AUS 3rd Test: ऑस्ट्रेलियाचा ऐतिहासिक विजय, लाहोर कसोटीत पाकिस्तानला धोबीपछाड देत 24 वर्षानंतर पाकिस्तानात जिंकली मालिका
पॅट कमिन्स याच्या नेतृत्वाखालील ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघाने लाहोर मधील मालिकेतील तिसरी आणि शेवटची कसोटी 115 धावांच्या फरकाने जिंकून मालिका 1-0 अशी जिंकली. 24 वर्षानंतर कांगारू संघाने पाकिस्तानात कसोटी मालिका जिंकली आहे. पाकिस्तानला चौथ्या डावात विजयासाठी 351 धावांचे लक्ष्य मिळाले होते. मात्र बाबर आजमच्या नेतृत्वातील संघ 235 धावांवर गारद झाला आणि सामन्यासह मालिकाही गमावली.
पॅट कमिन्स (Pat Cummins) याच्या नेतृत्वाखालील ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघाने (Australia Cricket Team) लाहोर मधील मालिकेतील तिसरी आणि शेवटची कसोटी 115 धावांच्या फरकाने जिंकून मालिका 1-0 अशी जिंकली. तब्बल 24 वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर पाकिस्तान दौऱ्यावर (Pakistan Tour) आलेला ऑस्ट्रेलियन संघ निर्जीव खेळपट्ट्यांवर यजमानांना आव्हान देण्यात यशस्वी ठरला. तसेच ऑस्ट्रेलियाने 2011 नंतर आशियात पहिली टेस्ट मालिका जिंकली आहे.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)