PAK vs AFG 2nd ODI Highlights: नसीम शाहचा पुन्हा धमाका, अफगाणिस्तानच्या जबड्यातून विजय हिसकावला; पहा शेवटच्या षटकाचा थरार (Watch Video)
शादाब खान उत्कृष्ट खेळात होता पण तो बाद झाल्यानंतर नसीम शाहने सामना फिरवला आणि अफगाणिस्तानच्या जबड्यातून विजय हिसकावला.
Pakistan Beat Afghanistan: पाकिस्तानचा खेळाडू नसीम शाहने (Naseem Shah) पुन्हा धमाका केला आहे. गुरुवारी हंबनटोटा येथे खेळल्या गेलेल्या अफगाणिस्तानविरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात नसीम फिनिशर म्हणून उदयास आला. त्याने पाचव्या चेंडूवर चौकार मारून अफगाणिस्तानच्या जबड्यातून विजय हिसकावून घेतला. खालच्या क्रमावर नसीमच्या स्फोटक फलंदाजीमुळे पाकिस्तानने 1 चेंडू शिल्लक असताना 1 गडी राखून सामना जिंकला. या सामन्यातील शेवटचे षटक अतिशय रोमांचक होते. 301 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना पाकिस्तानला शेवटच्या षटकात 6 चेंडूत 11 धावांची गरज होती. शादाब खान उत्कृष्ट खेळात होता पण तो बाद झाल्यानंतर नसीम शाहने सामना फिरवला आणि अफगाणिस्तानच्या जबड्यातून विजय हिसकावला.
पहा व्हिडिओ
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)