On This Day in 2017: जेव्हा रोहित शर्माने केली चौकार आणि षटकारांची बरसात, ठोकले संयुक्त सर्वात वेगवान आंतरराष्ट्रीय T20 शतकाचा विक्रम (Watch Video)

या दरम्यान त्याने सर्वात जलद आंतरराष्ट्रीय टी-20 शतकाच्या दक्षिण आफ्रिकेचा फलंदाज डेविड मिलरच्या विक्रमाशी बरोबरी केली. रोहितने केएल राहुल सोबत सलामीसाठी 12.4 षटकात 165 धावा केल्या होत्या.

Rohit Sharma | (Photo Credits: Facebook)

22 डिसेंबर 2017 हा दिवस होता जेव्हा रोहित शर्माने (Rohit Sharma) इंदूरच्या होळकर क्रिकेट स्टेडियममध्ये धमाकेदार फलंदाजी केली आणि 35 चेंडूत शतक ठोकले. या दरम्यान त्याने सर्वात जलद आंतरराष्ट्रीय टी-20 शतकाच्या दक्षिण आफ्रिकेचा (South Africa) फलंदाज डेविड मिलरच्या विक्रमाशी बरोबरी केली. रोहितने आपल्या दणकेबाज खेळीत 12 चौकार आणि 10 उत्तुंग षटकार खेचले. भारताने 20 षटकांत 5 बाद 260 धावांचा डोंगर उभारला. प्रत्युत्तरात श्रीलंकेचा (Sri Lanka) डाव 17.2 मध्ये 172 धावांवर आटोपला आणि भारताने हा सामना 88 धावांनी जिंकला.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)