IND vs BAN 2nd Test Day 2 Live Streaming: दुसऱ्या दिवशी बांगलादेश पाडणार धावांचा पाऊस की भारतीय गोलंदाज करणार कहर; 'इथं' पाहा सामन्याचे थेट प्रक्षेपण

आज सामन्याचा दुसरा दिवस आहे. दोन्ही संघांमधील हा सामना कानपूरच्या ग्रीन पार्क स्टेडियमवर खेळला जात आहे. सामन्याला सकाळी 10.00 वाजता सुरुवात होईल. टीम इंडिया आणि बांगलादेश यांच्यात खेळल्या जात असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवसाचा खेळ खराब प्रकाशामुळे लवकर संपला.

IND vs BAN 2nd Test Day 2 Live Streaming: दुसऱ्या दिवशी बांगलादेश पाडणार धावांचा पाऊस की भारतीय गोलंदाज करणार कहर; 'इथं' पाहा सामन्याचे थेट प्रक्षेपण
IND vs BAN (Photo Credit - X)

India National Cricket Team vs Bangladesh National Cricket Team Match Scorecard:  भारतीय राष्ट्रीय क्रिकेट संघ (India National Cricket Team) विरुद्ध बांगलादेश राष्ट्रीय क्रिकेट संघ (Bangladesh National Cricket Team) यांच्यातील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसरा सामन्याला शुक्रवारपासून सुरुवाच झाली आहे. आज सामन्याचा दुसरा दिवस आहे. दोन्ही संघांमधील हा सामना कानपूरच्या ग्रीन पार्क स्टेडियमवर खेळला जात आहे. सामन्याला सकाळी 10.00 वाजता सुरुवात होईल. टीम इंडिया आणि बांगलादेश यांच्यात खेळल्या जात असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवसाचा खेळ खराब प्रकाशामुळे लवकर संपला. पहिल्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत बांगलादेश संघाने 3 गडी गमावून 107 धावा केल्या होत्या. ज्यामध्ये मुशफिकुर रहीम (6), मोमिनुल हक (40) धावा करून नाबाद आहेत. दरम्यान, चाहत्यानां या सामन्याचे थेट प्रक्षेपण स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर उपलब्ध असेल. त्याचवेळी चाहत्यांना जिओ सिनेमा ॲप, फॅनकोड ॲप आणि वेबसाइटवर या सामन्याचा आनंद घेता येईल. याशिवाय आगामी मालिकेची प्रत्येक क्षणाची माहिती तुम्ही Latestly Marathi च्या वेबसाइटवर पाहू शकता.

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Sep 28, 2024 08:20 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).