NZ vs BAN 1st Test: क्रिकेट इतिहासातील आतापर्यंतचा सर्वात वाईट रिव्यू? बांगलादेशच्या DRS निर्णयावर समालोचकांनाही हसू फुटले (Watch Video)

असाच काहीसा प्रकार बांगलादेश आणि न्यूझीलंड यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्यात घडला. बांगलादेश संघाने असा रिव्ह्यू घेतला, जे पाहून समालोचकांनाही हसू आवरता आले नाही. बांगलादेशने आतापर्यंतचा सर्वात विचित्र DRS घेत एक रिव्यू वाया घालवला.

बांगलादेशचा सर्वात वाईट रिव्यू (Photo Credit: Twitter)

NZ vs BAN 1st Test: बांगलादेशने (Bangladesh) आतापर्यंतचा सर्वात विचित्र DRS घेत एक रिव्यू वाया घालवला. न्यूझीलंडविरुद्ध (New Zealand) पहिल्या कसोटीच्या चौथ्या दिवशी, रॉस टेलरच्या (Ross Taylor) बॅटला चेंडू स्पष्टपणे स्पर्श होत असतानाही पाहुण्या संघाने विचित्र DRS रिव्यू घेतला. टेलर 15 धावांवर खेळत असताना त्याने तस्किन अहमदहचा यॉर्कर चेंडू खेळला. पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे, बांगलादेशला वाटले की त्यात आणखी बरेच काही आहे आणि त्याने रिव्यू घेण्याचा निर्णय घेतला.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)