NZ vs BAN 1st Test: क्रिकेट इतिहासातील आतापर्यंतचा सर्वात वाईट रिव्यू? बांगलादेशच्या DRS निर्णयावर समालोचकांनाही हसू फुटले (Watch Video)

सामन्यात अनेकवेळा असे निर्णय उत्साहाच्या भरात घेतले जातात, ज्याचा नंतर पश्चाताप होतो. असाच काहीसा प्रकार बांगलादेश आणि न्यूझीलंड यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्यात घडला. बांगलादेश संघाने असा रिव्ह्यू घेतला, जे पाहून समालोचकांनाही हसू आवरता आले नाही. बांगलादेशने आतापर्यंतचा सर्वात विचित्र DRS घेत एक रिव्यू वाया घालवला.

NZ vs BAN 1st Test: क्रिकेट इतिहासातील आतापर्यंतचा सर्वात वाईट रिव्यू? बांगलादेशच्या DRS निर्णयावर समालोचकांनाही हसू फुटले (Watch Video)
बांगलादेशचा सर्वात वाईट रिव्यू (Photo Credit: Twitter)

NZ vs BAN 1st Test: बांगलादेशने (Bangladesh) आतापर्यंतचा सर्वात विचित्र DRS घेत एक रिव्यू वाया घालवला. न्यूझीलंडविरुद्ध (New Zealand) पहिल्या कसोटीच्या चौथ्या दिवशी, रॉस टेलरच्या (Ross Taylor) बॅटला चेंडू स्पष्टपणे स्पर्श होत असतानाही पाहुण्या संघाने विचित्र DRS रिव्यू घेतला. टेलर 15 धावांवर खेळत असताना त्याने तस्किन अहमदहचा यॉर्कर चेंडू खेळला. पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे, बांगलादेशला वाटले की त्यात आणखी बरेच काही आहे आणि त्याने रिव्यू घेण्याचा निर्णय घेतला.

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Jan 04, 2022 02:18 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).