SL vs NZ: रीले रूसो नंतर न्युझीलँडच्या ग्लेन फिलिप्सने विश्वचषकात ठोकले शतक, ठरला दुसरा फंलदाज
श्रीलंकेविरुद्धच्या महत्त्वाच्या सामन्यात फिलिप्सने तुफानी फलंदाजी करत आपल्या संघासाठी चांगला स्कोर उभा केला.
सिडनीत न्युझीलँड विरुद्ध श्रीलंकेविरुद्धच्या (SL vs NZ) सामन्यात ग्लेन फिलिप्सने (Glenn Phillips) झंझावाती शतक झळकावले. फिलिप्स T20 विश्वचषकात शतक झळकावणारा न्यूझीलंडचा दुसरा फलंदाज जगातील 10वा फलंदाज ठरला आहे. फिलिप्सचे हे टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील दुसरे शतक आहे. श्रीलंकेविरुद्धच्या महत्त्वाच्या सामन्यात फिलिप्सने तुफानी फलंदाजी करत आपल्या संघासाठी चांगला स्कोर उभा केला. मात्र, सामन्यादरम्यान फिलिप्सचे दोन झेल श्रीलंकेच्या खेळाडूंनी सोडले, त्यामुळे श्रीलंकेच्या संघाला मोठा फटका सहन करावा लागला. फिलिप्सने 61 चेंडूत शतक झळकावण्याचा धडाका लावला.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)