New Zealand Squad announced for Test against AFG & SL: न्यूझीलंड क्रिकेट संघ जाहीर, पाच फिरकीपटूंना संधी; अफगाणिस्तान, श्रीलंकेसोबत सामना
तर श्रीलंकेत 18 आणि 26 सप्टेंबरपासून दोन कसोटी सुरू होतील. अनुभवी वेगवान गोलंदाज टीम साऊदीकडे संघाची कमान आहे.
New Zealand Test Squad: न्यूझीलंडने पुढील महिन्यात भारतामध्ये अफगाणिस्तानविरुद्ध होणारी एकमेव कसोटी आणि श्रीलंकेविरुद्धच्या दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी संघाची घोषणा केली आहे. न्यूझीलंड संघात पाच फिरकीपटूंना स्थान देण्यात आले आहे. न्यूझीलंड आणि अफगाणिस्तान यांच्यातील एकमेव कसोटी भारतातील ग्रेटर नोएडा येथे 9 ते 13 सप्टेंबर दरम्यान खेळवली जाणार आहे. तर श्रीलंकेत 18 आणि 26 सप्टेंबरपासून दोन कसोटी सुरू होतील. अनुभवी वेगवान गोलंदाज टीम साऊदी कर्णधार असेल तर संघात केन विल्यमसन, डेव्हॉन कॉनवे, ग्लेन फिलिप्स आणि रचिन रवींद्र सारखे खेळाडू आहेत. तसेच, फिरकी अष्टपैलू मिचेल ब्रेसवेल दुखापतीनंतर 18 महिन्यांनंतर पुनरागमन करत असून, त्याच्यासह मिचेल सँटनर, एजाज पटेल, ग्लेन फिलिप्स आणि रवींद्र फिरकीची जबाबदारी सांभाळतील.
न्यूझीलंड संघ:
टीम साऊदी (कर्णधार), टॉम ब्लंडेल, मिचेल ब्रेसवेल, डेव्हॉन कॉनवे, मॅट हेन्री, टॉम लॅथम, डॅरिल मिशेल, विल ओ'रूर्क, एजाज पटेल, ग्लेन फिलिप्स, रचिन रवींद्र, मिचेल सँटनर, बेन सियर्स, केन विल्यमसन, विल यंग.