IND vs NZ ICC World Cup 2023 Live Score Update: न्युझीलंडने भारतासमोर ठेवले 274 धावांचे लक्ष्य, मोहम्मद शमीने घेतल्या पाच विकेट
भारताने टाॅस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. या सामन्यात मोहम्मद शमी आणि सूर्यकुमार यादव यांचा संघात समावेश करण्यात आला आहे. प्रथम फलंदाजी करत न्युझीलंड संघाने भारतासमोर 274 धावांचे लक्ष्य ठेवले आहे.
आयसीसी विश्वचषक 2023 च्या 21व्या (ICC Cricket World Cup 2023) सामन्यात भारत आणि न्यूझीलंडचे (IND vs NZ) संघ आज आमनेसामने आहेत. हा सामना धर्मशाला येथील हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर खेळवला जात आहे. भारत आणि न्यूझीलंड हे संघ या विश्वचषकाचे आतापर्यंतचे सर्वोत्तम संघ आहेत आणि दोघांनी 4-4 सामने जिंकले आहेत. अशा स्थितीत कोणत्या संघाचा विजय रथ थांबणार हे पाहणे विशेष ठरणार आहे. दरम्यान, भारताने टाॅस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. या सामन्यात मोहम्मद शमी आणि सूर्यकुमार यादव यांचा संघात समावेश करण्यात आला आहे. प्रथम फलंदाजी करत न्युझीलंड संघाने भारतासमोर 274 धावांचे लक्ष्य ठेवले आहे. न्युझीलंडकडून डॅरिल मिशेल आणि रचिन रवींद्र 75 सर्वाधिक धावा केल्या आहे. तर भारताकडून मोहम्मद शामीने सर्वाधिक 5 विकेट घेतल्या आहे. भारताला हा सामना जिंकण्यासाठी 50 षटकात 274 धावा करायच्या आहे.
CWC2023. WICKET! 49.5: Daryl Mitchell 130(127) ct Virat Kohli b Mohammad Shami, New Zealand 273/9 https://t.co/MrCP495zvG #INDvNZ #CWC23
— BCCI (@BCCI) October 22, 2023
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Oct 22, 2023 06:04 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

