Rachin Ravindra Century: बंगळुरू कसोटीत न्यूझीलंडची धावसंख्या 310 पार, रचिन रवींद्रने ठोकले झंझावती शतक
रचिन रवींद्रने बेंगळुरू कसोटी सामन्यात शतक झळकावले. रचिनने 124 चेंडूत 11 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने आपले दुसरे शतक पूर्ण केले. यासह न्यूझीलंडने 289 धावांची आघाडी घेतली आहे.
Indian National Cricket Team vs New Zealand National Cricket Team: भारत आणि न्यूझीलंड यांच्यात पहिल्या कसोटी सामन्याला (IND vs NZ 1st Test 2024) बुधवारपासून सुरुवात झाली आहे. दोन्ही संघांमधील हा सामना बेंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर (M. Chinnaswamy Stadium, Bengaluru) पार पडत आहे. पावसामुळे पहिल्या दिवसाचा खेळ होऊ शकला नाही. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत न्यूझीलंड संघाने 50 षटकांत तीन गडी गमावून 180 धावा केल्या होत्या. त्याआधी, प्रथम फलंदाजी करताना भारत पहिल्या डावात 46 धावांवर ऑलआऊट झाला. ही भारताची कसोटी डावातील सर्वात कमी धावसंख्या आहे. तिसऱ्या दिवसाच्या खेळाला सुरूवात झाली आहे. रचिन रवींद्रने बेंगळुरू कसोटी सामन्यात शतक झळकावले. रचिनने 124 चेंडूत 11 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने आपले दुसरे शतक पूर्ण केले. यासह न्यूझीलंडने 289 धावांची आघाडी घेतली आहे.
2023: A hundred in his first ODI innings in Bengaluru
2024: A hundred in his first Test innings in Bengaluru
Rachin Ravindra's special connection with this place ✨ https://t.co/tzXZHnJPJI #INDvNZ pic.twitter.com/r7irFpLTO0
— ESPNcricinfo (@ESPNcricinfo) October 18, 2024
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Oct 18, 2024 11:29 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

