Pakistan Men's Central Contract list: पाकिस्तान क्रिकेट बोर्ड आणि खेळाडूंमध्ये नवा करार, आता वाढवून मिळणार पगार

पाकिस्तान क्रिकेट बोर्ड आणि खेळाडूंमध्ये नवा करार झाला आहे. त्यामुळे पाकिस्तानी खेळाडूंचा पगार वाढणार आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्ड आता पाकिस्तानी खेळाडूंना वार्षिक (एक वर्षाच्या) कराराऐवजी तीन वर्षांचा करार दिला आहे. जे पाकिस्तान क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदाच घडले आहे.

PAK Team (Photo Credit - Twitter)

भारतात होणाऱ्या विश्वचषकापूर्वी पाकिस्तानी खेळाडूंनी त्यांच्या पगाराची मागणी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाकडे केली होती. पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमसह खेळाडूंना गेल्या चार महिन्यांपासून बोर्डाकडून वेतन मिळालेले नाही. त्यामुळे पाकिस्तानी खेळाडूंनी वर्ल्ड कप प्रमोशनसारख्या गोष्टींपासून दूर राहण्याचा निर्णय घेतला होता. या सर्व गोष्टी पाहून बाबर आझमची टीम 27 सप्टेंबरला भारताला रवाना होण्यासाठी सर्वप्रथम दुबईला रवाना झाली. त्यानंतर लगेचच पाकिस्तान क्रिकेट बोर्ड आणि खेळाडूंमध्ये नवा करार झाला आहे. त्यामुळे पाकिस्तानी खेळाडूंचा पगार वाढणार आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्ड आता पाकिस्तानी खेळाडूंना वार्षिक (एक वर्षाच्या) कराराऐवजी तीन वर्षांचा करार दिला आहे. जे पाकिस्तान क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदाच घडले आहे. त्यामुळे खेळाडूंच्या कमाईतही वाढ होईल. तर पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला आयसीसीकडून जे काही महसूल मिळेल. त्यातील काही भाग खेळाडूंमध्ये वाटला जाईल. मात्र, पाकिस्तानी खेळाडूंचा पगार तीन महिन्यांनंतर वाढणार आहे. त्यामुळे त्यांना 2023 च्या विश्वचषकात जुन्या नियमांनुसार खेळावे लागणार आहे. ज्यामध्ये त्यांना मॅच फी आणि मासिक रिटेनर फी मिळणार नाही.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement