Team Pakistan Fielding Video: येड्यांचा बाजार, खुळ्यांचा दरबार! पाकिस्तान टीमची गादीवर कॅच प्रॅक्टिस, व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली
पाकिस्तानचा क्रिकेट संघ वेळोवेळी हसण्याचा विषय बनतो. विश्वचषकापूर्वी खेळाडू सैन्याकडून प्रशिक्षण घेतात आणि डोंगरावरील दगड उचलतात. यावेळी खेळाडूंनी गादीवर कॅचचा सराव सुरू केला.
Team Pakistan Fielding Video Viral: टी-20 विश्वचषकात अत्यंत खराब कामगिरीनंतर पाकिस्तान (Pakistan) संघ बाहेर पडला, तेव्हापासून चाहते संतापले असून पाकिस्तान संघाचे वर्णन अत्यंत सरासरी संघ म्हणून केले जात आहे. कोणी यासाठी कर्णधार बाबर आझमला दोष देत आहेत तर कोणी गोलंदाजांवर निशाणा साधत आहेत. त्यामुळे खेळाडूंच्या फिटनेसवरही प्रश्न उपस्थित होत आहेत. आता एक नवीन व्हिडिओ समोर आला आहे. ज्यामुळे त्यांच्यावर अजुन टीका होत आहे. पाकिस्तानचा क्रिकेट संघ वेळोवेळी हसण्याचा विषय बनतो. विश्वचषकापूर्वी खेळाडू सैन्याकडून प्रशिक्षण घेतात आणि डोंगरावरील दगड उचलतात. यावेळी खेळाडूंनी गादीवर कॅचचा सराव सुरू केला. नेटकऱ्यांनी व्हिडिओ पाहिल्यावर पाकिस्तानची खिल्ली उडवली जात असल्याचे दिसले. हा व्हिडिओ सोशल मीडियावरही व्हायरल होत आहे.
पाहा व्हिडिओ
व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)