NED vs BAN ICC World Cup 2023 Toss Update: नेदरलँड्सने बांगलादेशविरुद्ध नाणेफेक जिंकली, प्रथम फलंदाजी करण्याचा घेतला निर्णय 

दोन्ही संघांमधील हा सामना कोलकात्याच्या ईडन गार्डन्सवर होणार आहे. कोलकातामध्ये खेळल्या जाणार्‍या या विश्वचषकातील हा पहिलाच सामना आहे.

विश्वचषकाच्या 28व्या सामन्यात बांगलादेशसमोर नेदरलँडचे (BAN vs NED) आव्हान आहे. दोन्ही संघांमधील हा सामना कोलकात्याच्या ईडन गार्डन्सवर होणार आहे. कोलकातामध्ये खेळल्या जाणार्‍या या विश्वचषकातील हा पहिलाच सामना आहे. बांगलादेश आणि नेदरलँडने आतापर्यंत प्रत्येकी एक विजय मिळवला आहे. दोघांनाही प्रत्येकी चार सामन्यांत पराभवाला सामोरे जावे लागले आहे. दरम्यान, नेदरलँड्सने बांगलादेशविरुद्ध नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

दोन्ही संघांचे प्लेइंग-11

बांगलादेश : तनजीद हसन, लिटन दास, नझमुल हुसेन शांतो, शकीब अल हसन (कर्णधार), मुशफिकुर रहीम (विकेटकीपर), महमुदुल्लाह, मेहदी हसन मिराज, महेदी हसन, तस्किन अहमद, मुस्तफिजुर रहमान, शरीफुल इस्लाम.

नेदरलँड : विक्रमजीत सिंग, मॅक्स ओडाड, वेस्ली बॅरेसी, कॉलिन अकरमन, स्कॉट एडवर्ड्स (कर्णधार/विकेटकीपर), बास डी लीडे, सायब्रँड एंजेलब्रेक्ट, लोगान व्हॅन बीक, शरीझ अहमद, आर्यन दत्त, पॉल व्हॅन मीकरेन.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement