T20 World Cup 2022 Qualifiers: नेपाळच्या विकेटकीपरने रनआउट करण्याची संधी गमावली पण क्रिकेट चाहत्यांची मने जिंकली, जगभरातून होत आहे वाहवाही; पहा Video

या सामन्यात नेपाळचा यष्टीरक्षक आसिफ शेखने सर्वांची मने जिंकली. आयर्लंडच्या खेळाडूला रनआउट करण्याची संधी शेखने गमावली असली तरी जगभरातून त्याने वाहवाही लुटली. या सामन्यात आसिफने तमाम क्रिकेट चाहत्यांची मने जिंकली. आसिफचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

नेपाळ खेळाडूच्या खेळाडूवृत्तीने जिंकली मने (Photo Credit: Twitter/ICC)

T20 World Cup 2022 Qualifiers: खेळाच्या मैदानात विजय किंवा पराभवापेक्षा योग्य खेळ भावना महत्त्वाची असते. खिलाडूवृत्तीने (Spirit Of Cricket) कोणताही संघ जिंकतो किंवा हरतो पण खेळ जिंकला जातो. असेच उदाहरण सोमवारी नेपाळच्या संघाने (Nepal Cricket Team) सादर केले, जेव्हा आयर्लंडविरुद्ध (Ireland) त्यांनी एका फलंदाजाला रनआउट केले नाही. नेपाळ संघाच्या या खिलाडूवृत्तीचे सर्वत्र कौतुक होत आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)