Nepal Qualifies for T20 World Cup 2024: नेपाळ टी-20 विश्वचषक 2024 साठी ठरला पात्र, 10 वर्षांनंतर केली आश्चर्यकारक कामगिरी
या विजयासह नेपाळ 10 वर्षांनंतर टी-20 विश्वचषकासाठी पात्र ठरला आहे.
नेपाळ 2024 च्या टी-20 विश्वचषकासाठी पात्र ठरला आहे. शुक्रवारी (3 नोव्हेंबर) मुलपाणी क्रिकेट मैदानावर खेळल्या गेलेल्या टी-20 विश्वचषक आशिया पात्रता स्पर्धेच्या उपांत्य फेरीत युएईचा 8 गडी राखून पराभव करून, नेपाळने पुढील वर्षी अमेरिका आणि वेस्ट इंडिजमध्ये खेळल्या जाणाऱ्या टी-20 विश्वचषकात आपले स्थान निश्चित केले. या विजयासह नेपाळ 10 वर्षांनंतर टी-20 विश्वचषकासाठी पात्र ठरला आहे, याआधी नेपाळने 2014 मध्ये शेवटचा टी-20 विश्वचषक खेळला होता. (हे देखील वाचा: Rishabh Pant आणि Akshar Patel पोहचले तिरुपती बालाजी मंदिरात, दर्शनानंतर चाहत्यांसोबत काढले फोटो (Watch Video)
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)