Naveen Ul Haq And Virat Kohli Shaking Hands: नवीन उल हकने विराट कोहलीसोबत घातली साद, मिटवला आपला वाद, पाहा फोटो
कोहलीच्या घरच्या मैदानावर खेळला जात आहे, त्यामुळे चाहते नवीन उल हकला मैदानात चिडवताना दिसले. पण जेव्हा कोहली फलंदाजीला आला तेव्हा नवीन उल हकने कोहलीला मिठी मारत आपला वाद मिटवला.
विश्वचषकाचा दहावा सामना भारत विरुद्ध अफगाणिस्तान (IND vs AFG) यांच्यात खेळला जात आहे. हा सामना सुरू होण्यापूर्वी चाहत्यांना पुन्हा विराट कोहली (Virat Kohli) आणि नवीन उल हक (Naveen Ul Haq) यांच्यातील लढतीची आठवण झाली. हा सामना कोहलीच्या घरच्या मैदानावर खेळला जात आहे, त्यामुळे चाहते नवीन उल हकला मैदानात चिडवताना दिसले. पण जेव्हा कोहली फलंदाजीला आला तेव्हा नवीन उल हकने कोहलीला मिठी मारत आपला वाद मिटवला. वास्तविक, आयपीएल 2023 दरम्यान अफगाण गोलंदाज नवीन उल हकने विराट कोहलीला भिडण्याची चूक केली होती. आयपीएल 2023 दरम्यान रॉयल चॅलेंजर्स बंगलोर आणि लखनौ सुपर जायंट्स आमनेसामने होते. दोन्ही खेळाडूंमध्ये जोरदार वादावादी झाली, परिस्थिती इतकी वाढली की खेळाडूंमध्ये बाचाबाची झाली.
पहा फोटो
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)