DC vs MI, IPL 2024 Toss Updae: मुंबईने दिल्लीविरुद्ध नाणेफेक जिंकली, गोलंदाजी करण्याचा घेतला निर्णय, पाहा दोन्ही संघांची प्लेइंग 11
या मोसमात दिल्ली कॅपिटल्स आणि मुंबई इंडियन्स हे संघ आमनेसामने येण्याची ही दुसरी वेळ असेल. शेवटच्या वेळी दोन्ही संघ एकमेकांशी भिडले तेव्हा मुंबई इंडियन्सने दिल्ली कॅपिटल्सचा 29 धावांनी पराभव केला.
DC vs MI, IPL 2024 43th Match: आज इंडियन प्रीमियर लीग 2024 मधील 43वा सामना (IPL 2024) दिल्ली कॅपिटल्स आणि मुंबई इंडियन्स (DC vs MI) यांच्यात खेळला जात आहे. दोन्ही संघांमधील हा सामना दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमच्या घरच्या मैदानावर खेळला जात आहे. या मोसमात दिल्ली कॅपिटल्स आणि मुंबई इंडियन्स हे संघ आमनेसामने येण्याची ही दुसरी वेळ असेल. शेवटच्या वेळी दोन्ही संघ एकमेकांशी भिडले तेव्हा मुंबई इंडियन्सने दिल्ली कॅपिटल्सचा 29 धावांनी पराभव केला. दिल्ली कॅपिटल्सने या मोसमात आतापर्यंत 9 सामने खेळले आहेत. या कालावधीत दिल्ली कॅपिटल्स संघ 4 सामने जिंकून गुणतालिकेत सहाव्या स्थानावर आहे. तर मुंबई इंडियन्सने आतापर्यंत 8 सामने खेळले आहेत. मुंबई इंडियन्सने 3 सामने जिंकले असून संघ 8व्या स्थानावर आहे. दरम्यान, मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पंड्याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.
मुंबई इंडियन्स (प्लेइंग इलेव्हन): रोहित शर्मा, इशान किशन (विकेटकीपर), तिलक वर्मा, नेहल वढेरा, हार्दिक पांड्या (कर्णधार), टिम डेव्हिड, मोहम्मद नबी, पियुष चावला, ल्यूक वुड, जसप्रीत बुमराह, नुवान तुषारा.
दिल्ली कॅपिटल्स (प्लेइंग इलेव्हन): जेक फ्रेझर-मॅकगुर्क, कुमार कुशाग्रा, शाई होप, ऋषभ पंत (कर्णधार/विकेटकीपर), ट्रिस्टन स्टब्स, अभिषेक पोरेल, अक्षर पटेल, कुलदीप यादव, लिझाद विल्यम्स, मुकेश कुमार, खलील अहमद.
🚨 Toss Update 🚨@mipaltan win the toss & elect to bowl against @DelhiCapitals
Follow the Match ▶️ https://t.co/BnZTzctcaH#TATAIPL | #DCvMI pic.twitter.com/eKzbl63cqZ
— IndianPremierLeague (@IPL) April 27, 2024
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Apr 27, 2024 03:09 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

