MI vs RR, IPL 2023 Live Score Update: मुंबई इंडियन्सचा स्फोटक फलंदाज सूर्यकुमार यादवने ठोकले अर्धशतक, राजस्थान रॉयल्स चौथ्या विकेटच्या शोधात

दोन्ही संघांमधील हा सामना मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर खेळला गेला.

सूर्यकुमार यादव (Photo Credit: PTI)

इंडियन प्रीमियर लीगच्या 16व्या हंगामातील 42 वा सामना आज मुंबई इंडियन्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात खेळला गेला. दोन्ही संघांमधील हा सामना मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर खेळला गेला. या सामन्यात मुंबई इंडियन्सने राजस्थान रॉयल्सचा एका विकेटने पराभव केला आहे. तत्पूर्वी, राजस्थान रॉयल्सचा कर्णधार संजू सॅमसनने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या राजस्थान रॉयल्स संघाने निर्धारित 20 षटकात 7 गडी गमावून 212 धावा केल्या. राजस्थान रॉयल्सच्या वतीने सलामीवीर यशस्वी जैस्वालने वेगवान फलंदाजी करताना 124 धावांची खेळी केली. मुंबई इंडियन्सकडून अर्शद खानने सर्वाधिक तीन बळी घेतले. लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या मुंबई इंडियन्स संघाचा स्फोटक फलंदाज सूर्यकुमार यादवने अवघ्या 24 चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. मुंबई इंडियन्स संघाचा स्कोर 143/3.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement