PBKS vs MI, Live Score Update: मुंबईने पंजाबवर सहा गडी राखून केली मात, इशान किशन आणि सूर्यकुमार यांनी ठोकली अर्धशतके

दोन्ही संघांमधील हा सामना पंजाब क्रिकेट असोसिएशनच्या आयएस बिंद्रा स्टेडियमवर खेळला गेला. या सामन्यात मुंबई इंडियन्सने पंजाब किंग्जचा सहा गडी राखून पराभव केला.

इंडियन प्रीमियर लीगच्या 16 व्या मोसमातील 46 वा सामना आज पंजाब किंग्ज आणि मुंबई इंडियन्स (MI vs PBKS) यांच्यात खेळला गेला. दोन्ही संघांमधील हा सामना पंजाब क्रिकेट असोसिएशनच्या आयएस बिंद्रा स्टेडियमवर खेळला गेला. या सामन्यात मुंबई इंडियन्सने पंजाब किंग्जचा सहा गडी राखून पराभव केला. तत्पूर्वी, मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. नाणेफेक हारल्यानंतर पंजाब किंग्जच्या संघाने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित 20 षटकात विकेट गमावत 214 धावा केल्या. पंजाब किंग्जसाठी लियाम लिव्हिंगस्टोनने 82 धावांची नाबाद खेळी खेळली. मुंबई इंडियन्सकडून पियुष चावलाने सर्वाधिक दोन विकेट घेतल्या. लक्ष्याचा पाठलाग करताना मुंबई इंडियन्स संघाने 18.5 षटकांत चार गडी गमावून लक्ष्य गाठले. मुंबई इंडियन्सकडून सलामीवीर इशान किशनने धडाकेबाज खेळी करताना 75 धावा केल्या. पंजाब किंग्जकडून नॅथन एलिसने दोन बळी घेतले.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement