Definitely Yes! एमएस धोनी IPL 2023 चेन्नई सुपर किंग्ज कडून खेळणार? ‘कॅप्टन कूल’ने दिले दिलखुश करणारे उत्तर (Watch Video)

MS Dhoni to Retire After IPL 2022: चेन्नई सुपर किंग्सचा स्टार कर्णधार एमएस धोनी पुढील वर्षी, आयपीएल 2023 मध्ये, खेळणार की नाही याबाबत सर्वाना उत्सुकता लागून राहिली आहे. राजस्थान रॉयल्सविरुद्ध नाणेफेक जिंकून या प्रश्नावर स्वतः धोनीने खुलासा केला. धोनी म्हणाला की, तो पुढच्या वर्षी खेळणार आहे कारण तो चाहत्यांना विशेषत: चेन्नईच्या चाहत्यांना निराश करू इच्छित नाही.

एमएस धोनी, सीएसके कर्णधार (Photo Credit: PTI)

IPL 2022, CSK vs RR Match 68: गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्जसाठी (Chennai Super Kings) आयपीएल (IPL) 2022 अपेक्षेप्रमाणे झाले नाही. पहिल्या चार सामन्यांत संघाला सलग पराभवाला सामोरे जावे लागले. तथापि, फ्रँचायझीला चालू हंगामातील वाईट टप्पा विसरून पुढे जायचे आहे. संघाचा स्टार खेळाडू एमएस धोनी (MS Dhoni) पुढील हंगामात खेळाडू म्हणून संघात सामील होणार असल्याची चांगली बातमी चाहत्यांसाठी आली असून तो कर्णधार म्हणून कायम राहण्याची शक्यताही वर्तवली जात आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now