Bangladesh Cricket Team: बांगलादेश क्रिकेट संघावर पैशांचा पाऊस, घरात घूसुन पाकिस्तानला पराभूत केल्याबद्दल मिळाले 'इतके' कोटी रुपये

14 सप्टेंबर रोजी, बांगलादेशच्या अंतरिम सरकारने बांगलादेश राष्ट्रीय क्रिकेट संघाला BDT 3.2 कोटी (भारतीय रुपयांमध्ये 2.25 कोटी) दिले.

Photo Credit - X

BAN vs PAK: बांगलादेश संघाने अलीकडेच पाकिस्तानविरुद्धची दोन सामन्यांची कसोटी मालिका 2-0 अशी जिंकून इतिहास रचला होता. बांगलादेशने पाकिस्तानच्या भूमीवर प्रथमच कसोटी मालिका जिंकली होती. संघाच्या या विजयानंतर बांगलादेश क्रिकेट संघावर पैशांचा पाऊस पडला आहे. बांगलादेश सरकारने संघाला करोडो रुपये दिले आहेत. 14 सप्टेंबर रोजी, बांगलादेशच्या अंतरिम सरकारने बांगलादेश राष्ट्रीय क्रिकेट संघाला BDT 3.2 कोटी (भारतीय रुपयांमध्ये 2.25 कोटी) दिले. BCB अध्यक्ष फारुख अहमद यांनी युवा आणि क्रीडा मंत्रालयाचे सल्लागार असिफ महमूद यांच्याकडून बोनस स्वीकारला, त्यातील काही भाग पूरग्रस्तांच्या मदतीसाठी दान केला जाईल. या कार्यक्रमाचा व्हिडिओ बांगलादेश क्रिकेटच्या अधिकृत पेजवरून शेअर करण्यात आला आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)



संबंधित बातम्या