IND vs NZ CWC 2023 Semi Final Live Score Update: मोहम्मद शामीचा पंच, न्यूझीलंडला दिला सातवा धक्का

भारताने टाॅस जिंकून फलंदाजी करत न्युझीलंडसमोर 398 धावांचे लक्ष्य ठेवले आहे. टीम इंडियासाठी स्टार फलंदाज विराट कोहलीने सर्वाधिक 117 धावांची खेळी खेळली. न्यूझीलंडकडून टीम साऊदीने सर्वाधिक तीन विकेट घेतल्या. हा सामना जिंकण्यासाठी न्यूझीलंड संघाला 50 षटकात 398 धावा करायच्या आहेत.

IND vs NZ CWC 2023 Semi Final Live Score Update: मोहम्मद शामीचा पंच, न्यूझीलंडला दिला सातवा धक्का

विश्वचषक 2023 चा (ICC World Cup 2023) पहिला उपांत्य सामना आज भारत आणि न्यूझीलंड (IND vs NZ) यांच्यात मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर खेळवला जात आहे. आजपर्यंत टीम इंडियाला उपांत्य फेरीसारख्या मोठ्या सामन्यात किवी संघाविरुद्ध विजय मिळवता आलेला नाही. पण यावेळी टीम इंडियाची फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण उत्कृष्ट राहिल्याने आज टीम इंडियाला हा विक्रम सुधारून अंतिम फेरी गाठण्याची सुवर्णसंधी आहे. दरम्यान, भारताने टाॅस जिंकून फलंदाजी करत न्युझीलंडसमोर 398 धावांचे लक्ष्य ठेवले आहे. टीम इंडियासाठी स्टार फलंदाज विराट कोहलीने सर्वाधिक 117 धावांची खेळी खेळली. न्यूझीलंडकडून टीम साऊदीने सर्वाधिक तीन विकेट घेतल्या. हा सामना जिंकण्यासाठी न्यूझीलंड संघाला 50 षटकात 398 धावा करायच्या आहेत. लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या न्यूझीलंडून संघाला सातवा धक्का बसला आहे. न्यूझीलंड संघाचा स्कोअर 306/7.

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Nov 15, 2023 10:13 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).