क्रिकेटर Rohit Sharma च्या कारकिर्दीमधील मैलाचा टप्पा; कसोटी क्रिकेटमध्ये पूर्ण केल्या 3500 धावा
वेस्ट इंडिजविरुद्ध खेळल्या जात असलेल्या दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेत (IND vs WI) रोहितने त्याच्या कसोटी कारकिर्दीत 3500 धावा पूर्ण केल्या आहेत.
रोहित शर्मा हा क्रिकेटच्या प्रत्येक फॉरमॅटमध्ये उत्कृष्ट फलंदाजीसाठी ओळखला जातो. आता वेस्ट इंडिजविरुद्ध खेळल्या जात असलेल्या दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेत (IND vs WI) रोहितने त्याच्या कसोटी कारकिर्दीत 3500 धावा पूर्ण केल्या आहेत. भारत-वेस्ट इंडिज कसोटी मालिकेतील पहिला सामना डॉमिनिका येथील विंडसर पार्क मैदानावर खेळवला जात आहे. दुसऱ्या दिवसाच्या पहिल्या सत्रात टीम इंडियाने पहिल्या डावात बिनबाद 146 धावा केल्या. यावेळी जैस्वालने पदार्पणाच्या सामन्यात अर्धशतक पूर्ण केले, तर रोहित शर्माने कारकिर्दीतील 15 वे अर्धशतक झळकावले. भारतीय कर्णधार रोहित शर्माने कसोटी कारकिर्दीत 3500 धावा पूर्ण केल्या आहेत. या सामन्यात यजमान संघ वेस्ट इंडिजने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि संपूर्ण संघ 150 धावांवर ऑलआऊट झाला. (हेही वाचा: Shreyas Iyer Health Update: टीम इंडियासाठी आनंदाची बातमी, ॲक्शन मोडमध्ये दिसला श्रेयस अय्यर)