Shreyas Iyer is Back: मधल्या फळीतील फलंदाज श्रेयस अय्यरचा दिल्ली कसोटीत सामन्यात सामवेश, 'हा' फलंदांज बाहेर बसण्याची शक्यता

बॉर्डर-गावस्कर मालिकेतील पहिल्या सामन्यातही तो खेळू शकला नाही. अशा स्थितीत कर्णधार रोहित शर्माला एका खेळाडूला वगळावे लागणार आहे.

श्रेयस अय्यर (Photo Credit: PTI)

IND vs AUS 2nd Test: भारत आणि ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) यांच्यातील चार सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसरा सामना 17 फेब्रुवारीपासून दिल्लीत खेळवला जाणार आहे. या मालिकेतील पहिल्या सामन्यातील विजयानंतर टीम इंडिया 1-0 ने पुढे आहे. या मालिकेच्या दुसऱ्या सामन्यापूर्वी टीम इंडियासाठी एक मोठी बातमी आहे. स्टार मधल्या फळीतील फलंदाज श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) पाठीच्या दुखापतीतून सावरला असून मालिकेतील दुसऱ्या सामन्यासाठी त्याचा संघात समावेश करण्यात आला आहे. श्रेयस अय्यर गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात बांगलादेशविरुद्ध खेळल्या गेलेल्या कसोटी सामन्यात संघाचा भाग होता, पण पाठीच्या खालच्या भागात दुखापत झाल्यामुळे न्यूझीलंडविरुद्धच्या वनडे मालिकेतून तो बाहेर पडला होता. बॉर्डर-गावस्कर मालिकेतील पहिल्या सामन्यातही तो खेळू शकला नाही. अशा स्थितीत कर्णधार रोहित शर्माला एका खेळाडूला वगळावे लागणार आहे. त्यामुळे सूर्यकुमार यादवला संघातून (Surya Kumar Yadav) वगळले जाईल, अशी शक्यता वर्तवली जात आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now