MI Beat PBKS, IPL 2024 33rd Match Live Score Update: रोमहर्षक सामन्यात मुंबई इंडियन्सचा पंजाब किग्जवर 9 धावांनी विजय, आशुतोष शर्माची शानदार अर्धशतकीय खेळी व्यर्थ

जसप्रीत बुमराह आणि जेराल्ड कॉट्झेच्या भेदम माऱ्यासमोर पंजाब किंग्जची टॉप ऑर्डर पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळली

जसप्रीत बुमराह आणि जेराल्ड कॉट्झेच्या भेदम माऱ्यासमोर पंजाब किंग्जची टॉप ऑर्डर पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळली. पंजाबची अवस्था 5 बाद 49 धावा अशी झाली असताना शशांक सिंहने एकाकी किल्ला लढवला त्यानंत आशुतोष शर्माची त्याला साथ लाभली. आशुतोष शर्माने 28 चेंडूत 61 धावा ठोकल्या तर शशांक सिंहने 25 चेंडूत 41 धावांचे योगदान दिले. त्यानंतर हरप्रीत ब्रारने 21 धावा करत पंजाबला सामना जिंकून देण्याचा प्रयत्न केला. मात्र मुंबईच्या गोलंदाजांनी पंजाबला 183 धावात रोखत सामना 9 धावांनी जिंकला.

पाहा पोस्ट-

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now