LSG vs CSK, IPL 2024 34th Match Toss Update: लखनौ सुपरजायंट्सने चन्नई विरुद्ध नाणेफेक जिंकली, प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला

सांघिक गुणतालिकेत चेन्नई सुपर किंग्ज 8 गुणांसह तिसऱ्या स्थानावर आहे. दुसरीकडे, लखनौ सुपर जायंट्सने 6 पैकी 3 सामने जिंकले असून, संघ गुणतालिकेत 5व्या क्रमांकावर आहे.

LSG vs CSK (Photo Credit - X)

LSG vs CSK, IPL 2024 34th Match: आज इंडियन प्रीमियर लीग 2024 चा 34 वा सामना (IPL 2024) लखनौ सुपर जायंट्स आणि चेन्नई सुपर किंग्ज (LSG vs CSK) यांच्यात होणार आहे. लखनौच्या घरच्या मैदानावरील भारतरत्न श्री अटल बिहारी वाजपेयी एकना क्रिकेट स्टेडियमवर संध्याकाळी 7.30 वाजता दोन्ही संघांमधील हा सामना सुरू होईल. चेन्नई सुपर किंग्सने आतापर्यंत 6 सामने खेळले असून 4 जिंकले आहेत. सांघिक गुणतालिकेत चेन्नई सुपर किंग्ज 8 गुणांसह तिसऱ्या स्थानावर आहे. दुसरीकडे, लखनौ सुपर जायंट्सने 6 पैकी 3 सामने जिंकले असून, संघ गुणतालिकेत 5व्या क्रमांकावर आहे. दरम्यान, लखनौ सुपरजायंट्सने चन्नई विरुद्ध नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

लखनौ सुपर जायंट्स (प्लेइंग इलेव्हन): क्विंटन डी कॉक, केएल राहुल (विकेटकीपर/कर्णधार), दीपक हुडा, मार्कस स्टॉइनिस, निकोलस पूरन, आयुष बडोनी, कृणाल पंड्या, मॅट हेन्री, रवी बिश्नोई, मोहसिन खान, यश ठाकूर.

चेन्नई सुपर किंग्ज (प्लेइंग इलेव्हन): ऋतुराज गायकवाड (कर्णधार), रचिन रवींद्र, अजिंक्य रहाणे, मोईन अली, शिवम दुबे, रवींद्र जडेजा, एमएस धोनी (विकेटकीपर), दीपक चहर, तुषार देशपांडे, मुस्तफिजुर रहमान, मथीशा पाथीराना

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)