Lucknow Super Giants Beat Gujarat Titans: लखनौने गुजरातचा 33 धावांनी केली पराभव, विजयाची साजरी केली हॅट्ट्रिक, यशने घेतल्या पाच विकेट
लक्ष्याचा पाठलाग करताना गुजरात टायटन्सचा संपूर्ण संघ 18.5 षटकांत केवळ 130 धावा करून अपयशी ठरला. गुजरात टायटन्ससाठी सलामीवीर साई सुदर्शनने सर्वाधिक 31 धावा केल्या. लखनौ सुपर जायंट्सकडून यश ठाकूरने सर्वाधिक पाच बळी घेतले.
LSG vs GT, IPL 2024 21st Match: इंडियन प्रीमियर लीग 2024 चा 21 वा (IPL 2024) सामना लखनौ सुपर जायंट्स आणि गुजरात टायटन्स (LSG vs GT) यांच्यात लखनौ येथील भारतरत्न श्री अटल बिहारी वाजपेयी एकना क्रिकेट स्टेडियमवर येथे खेळवला गेला. या रोमांचक सामन्यात लखनौ सुपर जायंट्सने गुजरात टायटन्सचा 33 धावांनी पराभव केला. तत्पूर्वी, लखनौ सुपर जायंट्सचा कर्णधार केएल राहुलने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीला आलेल्या लखनौ सुपर जायंट्सने 20 षटकांत 5 गडी गमावून 163 धावा केल्या. लखनौ सुपर जायंट्ससाठी स्टार फलंदाज मार्कस स्टॉइनिसने 58 धावांची शानदार खेळी केली. गुजरात टायटन्सकडून उमेश यादव आणि दर्शन नळकांडे यांनी प्रत्येकी दोन बळी घेतले. लक्ष्याचा पाठलाग करताना गुजरात टायटन्सचा संपूर्ण संघ 18.5 षटकांत केवळ 130 धावा करून अपयशी ठरला. गुजरात टायटन्ससाठी सलामीवीर साई सुदर्शनने सर्वाधिक 31 धावा केल्या. लखनौ सुपर जायंट्सकडून यश ठाकूरने सर्वाधिक पाच बळी घेतले.
Match 21. Lucknow Super Giants Won by 33 Run(s) https://t.co/P0VeEL9OOV #TATAIPL #IPL2024 #LSGVGT
— IndianPremierLeague (@IPL) April 7, 2024
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Apr 07, 2024 11:18 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

