Lasith Malinga Retires: श्रीलंकेचा वेगवान गोलंदाज लसिथ मलिंगाने घेतली क्रिकेटच्या सर्व फॉरमॅटमधून निवृत्ती; T-20 देखील खेळणार नाही

श्रीलंकेचा वेगवान गोलंदाज लसिथ मलिंगा टी -20 मधून निवृत्त झाला आहे.

Lasith Malinga (Photo Credits-Getty Image)

श्रीलंकेचा वेगवान गोलंदाज लसिथ मलिंगा टी -20 मधून निवृत्त झाला आहे. मलिंगाने आपल्या ट्विटरवर एक व्हिडिओ पोस्ट करून याची घोषणा केली आहे. मलिंगाने कसोटी आणि एकदिवसीय क्रिकेटमधून आधीच निवृत्ती घेतली होती, आता मलिंगा फ्रँचायझी टी-20 लीगमध्येही खेळताना दिसणार नाही. आयपीएल 2021 ची दुसरी फेरी 19 सप्टेंबरपासून होणार आहे. त्याआधी मलिंगाने निवृत्ती घेत मुंबई इंडियन्सलाही धक्का दिला आहे. सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट करून मलिंगाने सर्व फ्रँचायझी आणि श्रीलंका क्रिकेटचे आभार मानले आहेत.

लसिथ मलिंगाने घेतली निवृत्ती -

 

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now