IND vs BAN 1st ODI 2022: कुलदीप सेनला भारताकडून मिळाली पदार्पणाची संधी, कर्णधार रोहित शर्माने सांगितली मोठी गोष्ट

आयपीएलमध्ये आपल्या वेगवान गोलंदाजीने सर्वांना प्रभावित करणाऱ्या कुलदीपची बांगलादेश वनडे मालिकेसाठी टीम इंडियामध्ये निवड झाली होती.

Kuldeep Sen debut (Photo Credit - Twitter)

IND vs BAN: भारत आणि बांगलादेश (IND vs BAN) यांच्यातील तीन सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना ढाका येथील शेरे बांगला स्टेडियमवर खेळवला जात आहे. या सामन्यातून कुलदीप सेन भारताकडून पदार्पण करत आहे. आयपीएलमध्ये आपल्या वेगवान गोलंदाजीने सर्वांना प्रभावित करणाऱ्या कुलदीपची बांगलादेश वनडे मालिकेसाठी टीम इंडियामध्ये निवड झाली होती. कुलदीप सेनला (Kuldeep Sen) या मालिकेत पदार्पण करणं अवघड वाटत होतं, पण सामन्याच्या एक दिवस आधी मोहम्मद शमीला दुखापत झाली आणि टीम इंडियाचे दरवाजे कुलदीपसाठी उघडले. टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने कुलदीप सेनला कॅप देऊन संघात पदार्पण केले.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now