KKR vs DC IPL 2024 Live Inning Updates: कोलकाता नाईट रायडर्सच्या गोलंदाजांनी दिल्ली कॅपिटल्सला 153 धावांत रोखले, वरुण चक्रवर्तीने घेतले 3 विकेट
दिल्लीने 20 षटकांत 9 गडी गमावून 153 धावा केल्या आहेत. केकेआरकडून मिचेल स्टार्क 1, वैभव अरोरा 2, हर्षित राणा 2, सुनील नारायण 1, वरुण चक्रवर्तीने 3 बळी घेतले.
दिल्ली कॅपिटल्सने कोलकाता नाईट रायडर्सला 154 धावांचे लक्ष्य दिले आहे. कोलकाता नाईट रायडर्सच्या गोलंदाजांनी डीसी 9 फलंदाजांना बाद केले. वरुण चक्रवर्तीने ३ बळी घेतले आहेत. 29 एप्रिल (सोमवार), दिल्ली कॅपिटल्स (DC), सध्या आयपीएल 2024 मध्ये चमकदार कामगिरी करत आहेत, कोलकातामध्ये त्यांच्या घरच्या मैदानावर गुण मिळविण्याचा प्रयत्न करेल. केकेआर विरुद्ध डीसी सामना इडन गार्डन स्टेडियमवर खेळला जात आहे, दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार ऋषभ पंतने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीला आलेल्या दिल्ली कॅपिटल्सची सुरुवात चांगली झाली नाही कारण पॉवर प्लेमध्ये ३ महत्त्वाचे विकेट पडल्या. त्यानंतरही विकेट्स पडणे सुरूच होते. पण अखेरीस कुलदीप यादवच्या ३५ धावांच्या उत्कृष्ट खेळीमुळे संघाची मान वाचली. त्यामुळे दिल्लीने 20 षटकांत 9 गडी गमावून 153 धावा केल्या आहेत. केकेआरकडून मिचेल स्टार्क 1, वैभव अरोरा 2, हर्षित राणा 2, सुनील नारायण 1, वरुण चक्रवर्तीने 3 बळी घेतले.
पाहा पोस्ट -
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)