IPL 2023 Point Table: कोलकाताने रोमहर्षक सामन्यात बंगळुरूचा 21 धावांनी केला पराभव, ईथे पहा पॉइंट टेबलची स्थिती
कर्णधार विराट कोहलीने 37 चेंडूंत सहा चौकारांच्या मदतीने 54 धावांची खेळी केली. कोलकाता संघाने सलग चार सामने गमावल्यानंतर पहिला सामना जिंकला. त्याच वेळी, बंगळुरू संघ सलग दोन विजयानंतर पराभूत झाला.
आयपीएल 2023 च्या 36 व्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सने रॉयल चॅलेंजर्स बंगलोरचा (KKR vs RCB) 21 धावांनी पराभव केला. बेंगळुरूच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या सामन्यात नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना कोलकाताने 20 षटकात 5 गडी गमावून 200 धावा केल्या. जेसन रॉयने 29 चेंडूंत चार चौकार आणि पाच षटकारांच्या मदतीने 56 धावा केल्या. त्याचवेळी कर्णधार नितीश राणाने 21 चेंडूंत तीन चौकार आणि चार षटकारांच्या मदतीने 48 धावांची खेळी केली. प्रत्युत्तरात बंगळुरूचा संघ 20 षटकांत आठ गडी गमावून 179 धावाच करू शकला. कर्णधार विराट कोहलीने 37 चेंडूंत सहा चौकारांच्या मदतीने 54 धावांची खेळी केली. कोलकाता संघाने सलग चार सामने गमावल्यानंतर पहिला सामना जिंकला. त्याच वेळी, बंगळुरू संघ सलग दोन विजयानंतर पराभूत झाला. केकेआरचे आठ सामन्यांत तीन विजय आणि पाच पराभव आहेत. सहा गुणांसह संघ गुणतालिकेत सातव्या स्थानावर आहे. त्याचबरोबर बंगळुरूचा संघ आठ सामन्यांत चार विजय आणि चार पराभवांसह गुणतालिकेत पाचव्या स्थानावर आहे.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)