IND vs AUS 1st Semi-Final: कुलदीपचा निष्काळजीपणा पाहून कोहली आणि रोहित संतापले, मैदानातच फटकारले
महत्त्वाच्या सामन्यात कुलदीप यादव चेंडूच्या बाबतीत फॉर्ममध्ये नव्हता. कुलदीपच्या निष्काळजीपणामुळे भर मैदानात विराट कोहली आणि रोहित शर्मा संतापले.
India Natioanl Cricket Team vs Australian Men's Cricket Team: चॅम्पियन्स ट्रॉफीचा पहिला सेमीफायनल सामना भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात खेळला जात आहे. दुबईमध्ये भारतीय फिरकीपटूंनी कांगारू फलंदाजांना रोखले आहे. ऑस्ट्रेलियाने टाॅस जिंकून प्रथम फलंदाजी करत भारतासमोर विजयासाठी 265 धावांचे लक्ष्य ठेवले आहे. स्टीव स्मिथने 73 धावांची सर्वाधिक खेळी केली तर भारताकडून मोहम्मद शमीने 3 विकेट घेतल्या. तथापि, महत्त्वाच्या सामन्यात कुलदीप यादव चेंडूच्या बाबतीत फॉर्ममध्ये नव्हता. कुलदीपच्या निष्काळजीपणामुळे भर मैदानात विराट कोहली आणि रोहित शर्मा संतापले.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)