KL Rahul-Athiya Shetty Visited Ujjain: केएल राहुल-अथिया शेट्टीने उज्जैनच्या महाकालेश्वर मंदिरात केली प्रार्थना, पहा व्हिडिओ

महाकालच्या दर्शनावेळी केएल राहुल आणि अथिया शेट्टी पारंपरिक पोशाखात मंदिरात आले.

भारतीय क्रिकेट संघाचा सदस्य आणि बॉलिवूड अभिनेता सुनील शेट्टीचा जावई केएल राहुल (KL Rahul) रविवारी पत्नी अथिया शेट्टीसोबत (Athiya Shetty) उज्जैनला पोहोचला. येथील महाकालेश्वर मंदिरात त्यांनी बाबा महाकालाचे दर्शन घेतले. पहाटे 4 वाजता होणाऱ्या भस्म आरतीत दोघांनी सहभाग घेतला. यानंतर दोघांनी नवग्रह मंदिरात जाऊन पूजाअभिषेक केला. महाकाल मंदिराचे आशिष पुजारी यांनी मंदिर आणि उज्जैन या दोन्हींचे महत्त्व सांगितले. महाकालच्या दर्शनावेळी केएल राहुल आणि अथिया शेट्टी पारंपरिक पोशाखात मंदिरात आले.

पहा व्हिडिओ

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement