KKR vs MI, IPL 2024: आयपीएल सामन्यादरम्यान चाहत्याचा चक्क बॉल चोरण्याचा प्रयत्न; पोलिसांनी वेळीच पकडले, Viral Video
चेंडू पँटमध्ये टाकून चोरण्याची चाहत्याची योजना होती. पोलिसाने हा चेंडू परत घेऊन चाहत्याला मैदानाबाहेर हाकलले. ईडन गार्डन्सवर ही घटना घडली व या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
KKR vs MI, IPL 2024: आयपीएल 2024 च्या कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध मुंबई इंडियन्सच्या लढतीदरम्यान एका चाहत्याने चक्क सामन्यातील बॉल चोरण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर तिथे उपस्थित असलेल्या पोलिसाने या व्यक्तीकडून हा चेंडू परत मिळवला. चेंडू पँटमध्ये टाकून चोरण्याची चाहत्याची योजना होती. पोलिसाने हा चेंडू परत घेऊन चाहत्याला मैदानाबाहेर हाकलले. ईडन गार्डन्सवर ही घटना घडली व या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या सामन्यात कोलकाताने मुंबईचा 18 धावांनी पराभव केला होता. सध्या कोलकाता संघ 13 सामन्यांत 19 गुणांसह गुणतालिकेत अव्वल स्थानावर असून, पहिला क्वालिफायर खेळणे जवळपास निश्चित झाले आहे. (हेही वाचा: Ahmedabad Weather Live Updates: पावसामुळे GT vs KKR सामना रद्द, गुजरात प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर)
पहा व्हिडिओ-
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)